पैठण, (प्रतिनिधी): युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या तंत्रज्ञान अवगत करून स्वतःचे आयुष्य घडवावे असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजेंद्र कुलकर्णी यांनी नांदरच्या साक्षी संस्थेतर्फे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना व्यक्त करताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संदिपान भुमरे होते. पुढे बोलताना कुलगुरू कुलकर्णी म्हणाले, की जीवनात आपण कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठे झालो, तरीही त्याची मुळ ओळख त्याच्या गावावरूनच असते. देशभर झालेले सत्कार सोहळे महत्वाचे असतात. पण स्वतः च्या गावात गावकऱ्यांसमोर केलेल्या सत्काराने मी भारावून गेलो आहे.
माझ्या मनात आता वेगळे भावविश्व निर्माण झाले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारखे नवे दालन तरूणांसाठी खुले आहे. त्यांनी त्यात माक्षी बहुउद्देशिय सामाजिक सेवाभावी संस्था नांदर
हान गावाचा, सन्मानच्या पत्रांचा करिअर करावेअसे आवाहन कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.
कुलगुरू झाल्यानंतर नांदर या त्यांच्या मुळ गावी त्यांचा रविवारी (दि. २६) रोजी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. साक्षी बहुद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे ङ्गड्डूअभिमान गावाचा, सन्मान नांदरच्या भूमिपुत्रांचाफ्फया विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८० युवक आणि युवतींचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी, अविनाश लोंढे, मसापचे संचालक प्रा. संतोष तांबे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदिप काळे, सरपंच विजय गायकवाड आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. संदीप काळे यांनी केले. रामेश्वर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच विजय गायकवाड यांनी आभार मानले. विजय औटे, उपसंरपंच आस्मान काळे, रेवणनाथ कर्डीले, शिवाजी मगरे, प्रवीण काळे, कमलाकर एडके, सुनिल चितळे, माजी सभापती नंदू पठाडे आदींची मंचावर उपस्थिती होती.
सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर काळे, चंद्रा मगरे, चंद्रकांत मगरे, प्रजाला जोगदंड, संतोष राऊत आदींसह ८०
जणांचा यावेळी गौरव करण्यातण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना खा. संदीपान भुमरे म्हणाले की, मंदिराचे सभामंडप आवश्यकच, पण वाचनालयेही सुरू व्हावीत, मला लोकसभा मतदारसंघातील ग्रामस्थ निधीतून मंदिराला सभामंडप द्या, म्हणून मागणी करतात. असे सभामंडप गरजेचेच आहेत. पण त्याशिवाय गावा-गावात वाचनालये सुरू झाली पाहिजे. वाचनालयातून युवा पिढीला दिशानिर्देश मिळेल.
त्यांना त्यांचे करिअर घडवण्यास मदत होते. आपल्या गावातील कोणत्याही क्षेत्रात प्रगती करुन नावलौकिक करणाऱ्यांचा हा सन्मान माझ्या हस्ते झाला. राजकीय जीवनातील नेत्रदीपक सोहळा मी पहिल्यांदाच पाहत आहे. गावागावात तालुका आणि प्रत्येक जिल्ह्यात असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे सांगितले, नांदरसह या परिसरातिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














